skip to main |
skip to sidebar
तू आणि मी...
दोनेक वर्षांपूर्वी "तू आणि मी" म्हणून एक फॉरवर्ड सुरु होते. त्यात "तू नगारा मी ढोल, तू उथळ मी खोल" असले बरेच काही होते. त्यावरूनच सुचलेल्या या ओळी.)तू कडा, मी घाट
तू पाऊल, मी वाट
तू काल, मी आज
तू रूप, मी साज
तू भक्ति, मी ध्यास
तू प्रीती, मी आस
तू गंध, मी धुंद
तू सर, मी चिंब
तू कोकिळ, मी तान,
तू झरा, मी तहान
No comments:
Post a Comment