Friday, January 23, 2009

आठवण... जास्वंदाची...

सिग्नलवर थांबलो आणि कुठून तरी एक धून कानावर पडली... शेजारच्या ऑटोरिक्शा मध्ये रेडियो सुरु होता. गाणं कुठलं होतं ते आठवत नाही पण ते संगीत मात्र मला दूर दूर कुठेतरी घेउन गेलं... वळवाच्या सरीनं मातीचा गंध पसरावा तसा भूतकाळ तरळला मनात... अणि पहिला आठवला तो अंगणातला जास्वंद आणि धो धो पावसात खिडकीत उभं राहून त्याच्याशी मारलेल्या गप्पा... आठवले ते वेडे मन... काटेकुटे तुडवत पाखरांच्या मागे धावणारे आणि चांदण्यांमधे हरवत रात्र रात्र जागणारे... आजूबाजूला कुणीही नसताना एकटेपणाचा स्पर्शही नसणारे मंतरलेले दिवस... चारचौघात कुणी ओळखत नसताना स्वतःला मात्र अचूक ओळखणारे दिवस... कितीतरी स्वप्न पाहत सारं जगच रंगविणारे दिवस... कुणाच्या तरी आठवणीत झुरणारे अन् वाऱ्याच्या झुळूकेपरी शहारणारे दिवस...

त्या अलवार आठवणी डोळ्यांसमोरून अलगद तरळून गेल्या.. कवितेची शेवटची ओळ सूचत नाही म्हणून दिवसभर तळमळणार्र्यां आणि मध्यरात्री नंतर कधीतरी हवी तशी कविता कागदावर उतरली म्हणून आनंदणार्र्यौ मनाचं वेडेपण सहज हसवून गेलं... आपल्या आठवणीतच किती गोष्टी असतात... आपल्याला हसविणार्र्यां खुलाविणार्र्यां.... त्या बहरलेल्या जास्वन्दासारख्या...

..... अचानक किंचाळणारे कितीतरी हाँर्न कानावर आदळले... मनातल्या आठवणीही गोंगाटात विरून गेल्या त्या गाण्यासारख्याच... आणि मीही अभावितपणे गाडीला किक मारली... चारचौघांसारखी!!!

Page copy protected against web site content infringement by Copyscape

3 comments:

  1. हेल्लो विष्णु,
    दिवासताल्या एक क्षण इतके दूर नेवू शकतो हे माला माहित नव्हते.
    खरच खुप छान लिहिला आहेस ब्लॉग.
    अभिनंदन...

    - अभिरूप

    ReplyDelete
  2. Waaaha!!!!
    this is really wonderful...
    keep writing my dear friend.

    Cheers,
    Sumit.

    ReplyDelete
  3. Jabardast.. tu kavita lihaychas?? kamal ahe.. mala mahit navta kadhich.. pan he matra zakkasach jamlay bagh tula..

    ReplyDelete